पंतप्रधान मोदी उद्या संयुक्त राष्ट्रसंघाला करणार संबोधित
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्र संघाला संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्ताने न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी हे भारताच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या विजयानंतर संयुक्त राष्ट्रमध्ये पहिल्यांदाच संबोधन करणार आहेत.
दरम्यान यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली होती.
Post a Comment