'खुलके जीने का' म्हणणाऱ्या सुशांतचे गाणे रिलीज



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' रिलीज कधी होणार, याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. २४ जुलैला डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. याआधी चित्रपटातील गाणी रिलीज करण्यात आली आहे. 'दिल बेचारा टायटल ट्रॅक' आणि 'तारे गिन' या गाण्यांनंतर आता नवे गाणे 'खुलके जीने का' रिलीज झाले आहे. गाण्यात सुशांत आणि संजना सांघीची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे.
'खुलके जीने का'चे शूटिंग पॅरिसमध्ये झाले असून अरिजीत सिंहने आवाज दिला आहे. लिरिक्स अभिजीत भट्टाचार्याने लिहिले आहेत.
संजनाने गाण्याचे पोस्टर शेअर करत लिहिले होते, "आपण ऐकण्याचे आणि प्रेम करण्याचे काम तर केले आहे. आता आमच्यासोबत #KhulKeJeenaKa टाईम आले आहे."

'दिल बेचारा' चित्रपटातून संजना सांघी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडादेखील दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत आहेत.

सुशांतने १४ जूनला बांद्रा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post