...तर मोठी किंमत चुकवावी लागेल - राहुल गांधी
माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - करोना आणि चीनसह अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वितद्वारे पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये तीन मुद्दे मांडले आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, "भाजपा संस्थागतपणे खोटे पसरवत आहे. केंद्र सरकारने करोना चाचण्यात व्यत्यय आणून मृतांची संख्या चुकीची नोंदवली. GDP साठी नवीन पद्धत चालू केली. तसेच चीनचे आक्रमण झाकण्यासाठी मीडियावर दबाव आणत आहे. हे सर्व गोंधळ लवकरच उघडकीस येईल आणि देशाला याची मोठ्या प्रमाणात किंमत चुकवावी लागेल." अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
Post a Comment