आजीबाईच्या लाठीकाठी कौशल्याने रितेश देशमुखही अचंबित
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईंचा लाठीकाठी फिरवतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील हडपसरमधील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने ट्वि्टरव तो व्हिडिओ शेअर केला आहे. रितेशने व्हिडिओ शेअर करत या वीर योद्धा आजीबाई कोठे राहतात यांच्याबद्दल काही माहिती असेल तर कळवा असे सांगितले आहे. रितेशचा आगामी चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत येत आहे. यासाठी रितेश जोरदार तयारी करत आहे.
रितेश देशमुखच्या ट्विटला बऱ्याच जणांनी रिप्लाय देत त्या आजींचा पत्ता दिला.त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच रितेशने त्यांच्याशी संपर्क झाल्याचे ट्टिट करून सांगितले त्या गरीब कुटुंबातील असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी रस्तावर लाठीकाठी खेळून पोट भरतात. व्हिडिओमध्ये आजी अतिशय उत्तमरित्या लाठीकाठी खेळताना दिसत आहेत.यामुळे रितेशला याबद्दल उत्कंठा लागली असावी.
Post a Comment