अहमदनगर - जिल्ह्यात रविवारी (दि.2) कोरोना रुग्णांच्या संख्येत 403 ने वाढ झाली. काल 4 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 78 झाली आहे. तर 3 हजार 762 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 2 हजार 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 57, अँटीजेन चाचणीत 195 आणि खासगी प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये 151 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणी दुपारपर्यंत 24 रुग्ण बाधित आढळून आले होते. त्यामध्ये नगर शहर 14, संगमनेर 5, पाथर्डी 2, नगर ग्रामीण 1, भिंगार 1 आणि कोपरगाव येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा 33 रुग्ण बाधित आढळून आले. त्यामध्ये नगर शहरातील भिस्तबाग 1, शहर 1, मिलिटरी हॉस्पिटल 13, अकोले तालुक्यातील कळस 9, उंचखडक 1, पारनेरतालुक्यातील सुपा 2, पारनेर 3, रायतळे 1, गांजीभोयरे 1, कर्जत तालुक्यातील सुपेकरवाडी येथे एक रुग्ण आढळून आला आहे.
अँटीजेन चाचणीत आढळून आलेल्या 195 बाधितांमध्ये नगर शहर 10, संगमनेर 16, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 6, श्रीरामपूर 17, भिंगार 12, नेवासा 20, श्रीगोंदा 17, पारनेर 10, अकोले 4, शेवगाव 12, कोपरगाव 37, जामखेड 3 आणि कर्जत येथील 5 रुग्णांचा समावेश आहे. तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत आढळलेल्या 151 रुग्णांत नगर शहर 118, संगमनेर 7, राहाता 2, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 6, भिंगार 2, नेवासा 1, श्रीगोंदा 2, पारनेर 4, अकोले 4, शेवगाव 2 आणि कर्जत येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, काल 123 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये नगर शहर 52, संगमनेर 2, राहाता 5, पाथर्डी 14, नगर ग्रामीण 7, श्रीरामपूर 5, नेवासा 11, श्रीगोंदा 10, पारनेर 3, राहुरी 1, शेवगाव 1, कोपरगाव 8, जामखेड 3, इतर जिल्ह्यातील 1 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 3 हजार 762 झाली आहे.
Post a Comment