माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४६४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३०, अँटीजेन चाचणीत १९७ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१८ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७१, पाथर्डी ०९, नगर ग्रामीण ११, कॅंटोन्मेंट ०३, नेवासा ०२, पारनेर ०७, राहुरी १३, शेवगाव ०१, कोपरगाव ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, मिलिटरी हॉस्पीटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १९७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २०, संगमनेर २३, राहाता २२, पाथर्डी १२, श्रीरामपुर २४, नेवासा १८, श्रीगोंदा १२, अकोले ०४, राहुरी ०२, कोपरगाव ३४, जामखेड १४ आणि कर्जत १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण १२, श्रीरामपुर २६, कॅंटोन्मेंट ०३, नेवासा ०५, पारनेर ०६, अकोले ०४, राहुरी ०५, शेवगाव ०१, कोपरगांव ०३, जामखेड ०२, कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५७५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २२५, संगमनेर २३, राहाता २९, पाथर्डी २२, नगर ग्रा. ४९, श्रीरामपूर ३०, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा १९, श्रीगोंदा २५, पारनेर २६, अकोले १७, राहुरी २०, शेवगाव १३, कोपरगाव २८, जामखेड २२, कर्जत ०४, मिलिटरी हॉस्पीटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:१६२११*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३४६४*
*मृत्यू: २७८*
*एकूण रूग्ण संख्या:१९९५३*
Post a Comment