*आज ५४६ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज*
*आतापर्यंत १६७५७ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*आज नव्या ६३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता *८१.४०* टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६३२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५४७ इतकी झाली आहे.
Post a Comment