माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : लोकमान्य टिळक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपाची भावना निर्माण केली. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करुन देखाव्याच्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक, पौराणिक ही महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर आणली. तसेच साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आपली कला व संस्कृती समाजामध्ये रुजविली. आजच्या युवापिढीत यांच्या विचाराची खरी गरज आहे. युवा पिढीसमोर हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
शहर जिल्हा भाजपाच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपा संघटक सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, पुष्कर कुलकर्णी, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.
Post a Comment