माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी येथे रास्ता रोको करत महाएल्गार आंदोलनाद्वारे राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला.
या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, जिल्हा सचिव अनिल लांडगे, रासपचे तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे, जेष्ठनेते बाजीराव हजारे, रमेश पिंपळे, यांच्यासह सुभाष निमसे, पोपट साठे, पोपट बनकर, अनिल शेडाळे, बाळासाहेब ठोंबरे, सचिन लांडगे, राजेंद्र कोकाटे, आर एस कोकाटे, पोपट शेळके, अनिल गर्जे, शिवाजी बेरड, गणेश खांदवे, किरण गांगर्डे, महेश लांडगे, राजेंद्र लांडगे, मयूर वागस्कर, विनायक म्हस्के, लक्ष्मण कांबळे, गणेश भालसिंग, संदीप म्हस्के, भरत कोकाटे, विजय गाडे, मनोज म्हस्के, सागर गावडे, राहुल गुंड, शुभम शेळके, मनोज गावडे, बाप्पू कोकाटे, संतोष कोकाटे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने दुधाचे दर ३२ रुपयांवरून १७ ते १८ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. यामुळेच दुधाचा दर प्रतिलिटर ३०-३५ रुपये करा, गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्या, दुध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्या या मागण्यासाठी भाजपा व मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन महाएल्गार करण्यात आले.
यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, “कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी प्रचंड अडचणीत असताना राज्य सरकाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेले आहे, भाजपा सरकारच्या काळात दुधाला ३-४ वेळा दरवाढ देण्यात आलेली होती, परंतू सद्य परस्थितीत दुधापेक्षा पाण्याची बाटली महाग झालेली असताना देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्याना अपमानास्पद वगणून देण्याचे पाप करत आहे. राज्य सरकार जो पर्यंत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत आम्ही या विषयावरून मागे हटणार नसून वेळ पडल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे प्रतिपादन या वेळी कोकाटे यांनी केले.
Post a Comment