*आज ४४५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.०८ टक्के*
*आज नव्या ६०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२२८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११५, अँटीजेन चाचणीत २८८ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०० रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८२, संगमनेर ०३, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०२, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर ०७, राहुरी ०३, कोपरगाव ०६, जामखेड ०१, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २८८ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५०, संगमनेर ०७, राहाता २५, पाथर्डी १६, नगर ग्रामीण २५, श्रीरामपुर १४, कॅंटोन्मेंट ०६, नेवासा २०, श्रीगोंदा १४, पारनेर १६, अकोले ०७, राहुरी ३३, शेवगाव १२, कोपरगाव २५, जामखेड १२ आणि कर्जत ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११२, संगमनेर ०७, राहाता ०८, पाथर्डी ०६, नगर ग्रामीण ३०, श्रीरामपुर ०७, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ११, श्रीगोंदा ०१, पारनेर ०३, अकोले ०२, राहुरी ०३, शेवगाव ०१, कोपरगांव ०३ जामखेड ०२ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ४४५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १८४, संगमनेर ३७, राहाता १७, पाथर्डी १७, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा २४, श्रीगोंदा ११, पारनेर २०, अकोले १६, राहुरी ०७, शेवगाव २१, कोपरगाव २४, जामखेड १३, कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १३०५४*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३२२८*
*मृत्यू: २२६*
*एकूण रूग्ण संख्या:१६५०८*
Post a Comment