माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मार्च महिन्यात नगर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिल्हा प्रशासन चांगले काम करत जनतेला सुविधा दिल्या आहेत. जून महिन्यापर्यंत प्रशासनाने करोनाची पासिस्थिती आटोक्यात ठेवली होती. मात्र जुलै महिन्यापासून रुग्ण वाढत आहे. मात्र सातत्यने जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खाजगी करोना उपचार केंद्रे सुरु करावी लागली आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी करोणाचा प्रदुर्भाव कमी न होता अधिक वाढतच आहे. शहरात व जिल्ह्यात कन्टेंमेंट झोन मध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज जिल्ह्यात शेकडोच्या संख्येने करोना बाधित सापडत असून मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हात बाहेर परीस्थित जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा तातडीने पूर्ण लॉकडाऊन होणे गरजेचे आहे. प्रशासनाने शहरातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्यात करोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन करतात. मग नगर का नाही ? कोल्हापूर पेक्षा नगरची स्थिती बिकट झाली आहे. तातडीने लॉकडाऊन झाले नाही तर मृत्यूचे थैमान नगर मध्ये होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलावीत, अशी मागणी दीनदयाळ परीवाच्या वतीने जेष्ठनेते वसंत लोढा यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खा. सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ परिवाराच्या वतीने वसंत लोढा यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जागरूक नागरिक मंचाचे सुहास मुळे, बाळासाहेब भुजबळ, अमर कळमकर, अनिल शेकटकर आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ॲम्बुलन्स मध्ये दहा-बारा मृतदेह एकावर एक टाकल्याचे प्रकार नगर शहरात घडले आहेत. अजून कुठल्या प्रकारचे अराजकता होण्याची वाट पाहिली जात आहे. शहरातील परिस्थिती बिकट होत असतांना जिल्हा व महापालिका प्रशासन जनतेला सहकार्य करतांना दिसत नाहीये. या संकट काळात जिल्हाधिकारी नागरिकांना भेटतही नाहीत. नागरिकांच्या महत्वाच्या मागण्यांचे निवेदनही स्वीकारत नाहीत. प्रशासनाचा पूर्णपणे मनमानी कारभार चालू आहे. मनपाचा ढिसाळ कारभार सातत्त्याने उघड झाला आहे. आयुक्त रिटायरमेंटला आलेले असल्याने आधीक लक्ष घालत नाहीये. मनपाचे आरोग्याधिकारी विविध गुन्ह्यात अडकले असल्याने त्यांना या गंभीर परिस्थिती कडे लक्ष देण्यास वेळच नाहीये. अशा गंभीर परिस्थिती शहरातील नागरिकंच्या जीवाशी हे प्रशासन खेळत आहे. त्यामुळे तातडीने मनपाच्या आरोग्या अधीकाऱ्याला निलंबित करावे.
करोना बाधितांची व मृतदेहांची अवेहलाना शहरात होत आहे. करोना बाधितांना रुग्णालय व उपचार मिळण्यास मोठा विलंब होत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या तपासण्यांचा अहवाल मिळण्यासाठी वशिला, नंतर रुग्णालयात दाखल होण्यासठी वशिला, औषधोपचारासाठी वशिला लावावा लागत आहे. जर रुग्णाकडे तगडा वशिला असला तर चांगले उपचार होत आहेत. वशिला नसलेल्या सर्वसामन्या नागरिकांचे काय ? दुर्दैवाने जर रुग्ण दगावला तर मृतदेहांची अवेहलना, विटंबनाच्या घटना नगरमध्ये घडत आहेत. अंत्यसंस्कारास दोन दोन दिवस विलंब होत आहे. हा सर्व प्रशासनाचा कारभार भयंकर व संतापजनक आहे. जिल्हाप्रशासन व मनापा प्रशासनाचा आरोग्य विभाग यासर्व बाबींना जवाबदार आहे. जुन महिन्यापर्यंत देशात आदर्शवत काम जिल्हा प्रशासनान करत होते. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात एकदम परिस्थिती खालावली कशी ?
करोना पॉझेटिव्ह रुग्णांना कोविद उपचार केंद्रात चांगल्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. तसेच खाजगी कोविद उपचार सेंटरमध्ये सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. सोशल मिडीयावर या बाबत अनेक व्हिडीओ व्हायरल झाली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलावीत. मनपाचे अधिकारी व कर्मचारी बाजारपेठेत दुकानदारांवर कारवाई करतांना अनेक व्यापाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करत दंडाची वसुली करत आहेत. अधिकारी व कर्मचारी मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेत आहेत.
निवेदनावर मंदिर बचाव समितीचे बापू ठाणगे, मुख्याध्याप संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे, प्रा.मधुसूदन मुळे, बाळासाहेब भुजबळ, अनिल शर्मा, हरिभाऊ डोळसे, गौतम कराळे, बाळासाहेब खताडे, सदाभाऊ शिंदे, सोमनाथ चिंतामणी, सचिन पारखी आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment