११ हजार नगरकर कोरोनामुक्त ; आज वाढले ६८१ नवे रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम

*अहमदनगर:* जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७७.९८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९६१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११७, अँटीजेन चाचणीत ३५४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१० रुग्ण बाधीत आढळले.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७७ पाथर्डी ०३,  नगर ग्रा. ०६, श्रीरामपुर ०१, कॅन्टोन्मेंट ०३,  नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, अकोले १०, राहुरी ०४, शेवगाव ०१, कोपरगाव ०३, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३५४  जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ९८, संगमनेर २४, राहाता २९, पाथर्डी १३, श्रीरामपुर १५, कॅंटोन्मेंट १६, नेवासा ०५, श्रीगोंदा २६, पारनेर ३२, राहुरी ०३,  कोपरगाव ५२, जामखेड ३२ आणि कर्जत ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३९, संगमनेर ०५, राहाता ०६, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर ०२, कॅंटोन्मेंट ११, नेवासा ०८, श्रीगोंदा ०४, पारनेर ०९, राहुरी ०२, शेवगाव ०२, कोपरगाव ०१, जामखेड ०२ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा २३०,संगमनेर २४, राहाता ३५, पाथर्डी ३४,नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा १९, श्रीगोंदा १८, पारनेर ०५, अकोले ०४, राहुरी १५, शेवगाव १३,
कोपरगाव १३, जामखेड ०८, कर्जत २१, मिलिटरी हॉस्पिटल ०१,इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १११२५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२९६१*

*मृत्यू :१८१*

*एकूण रूग्ण संख्या:१४२६७*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post