बाबो, शव वाहिनीत कोंबून नेले कोरोना रुग्णांचे मृतदेह

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - शव वाहिनीत कोरोना रुग्णांचे मृतदेह कोंबून अमरधामकडे नेल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमधून समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मनपाच्या शव वाहिनीत मृतदेह भरल्याचा व्हिडिओ काढून आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका केली.

अहमदनगर मनपाने खिळखिळ्या आणि दरवाजेही लागत नसलेल्या शव वाहिनीत कोंबून मृतदेह अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच वाहनातून एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडल्याचा प्रकारही उघडीस आला होता. आता कोरोना बाधितांचे मृतदेह माल वाहतूककी प्रमाणे नेले जात ‌असल्याने पालिकेवर संताप व्यक्त होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post