माजी राष्ट्रपतींना कोरोना
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती जारी केली. त्यांनी सोमवारी दुपारी ट्विट करून लिहिले, की रुग्णालयात दुसऱ्या एका त्रासासाठी गेलो होतो. यावेळी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जे लोक गेल्या आठवड्यापर्यंत माझ्या संपर्कात आले त्यांना आवाहन करतो की त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून स्वतःला आयसोलेट करून घ्यावे.
Post a Comment