गुगलने चीनचे 2500 यू ट्युब चॅनेल केले डिलिट


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - सर्च इंजिन गुगलने चीनशी संबंधित 2 हजार 500 यू ट्युब चॅनेल डिलिट केली आहेत. हे चॅनेल्स दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे यू ट्युबवरून हे चॅनेल्स हटवले आहेत, अशी माहिती गुगलने दिली आहे. ही कारवाई चीनसाठी काम करणार्‍या या चॅनेल्सच्या तपासणीचा एक भाग असून हे यू ट्युब चॅनेल्स एप्रिल ते जूनदरम्यान हटवल्याचीही माहिती गुगलने दिली आहे. चीनचे हे यू ट्युब चॅनेल्स स्पॅम आणि बिगर-राजकीय कंटेन्ट पोस्ट करीत होते. गुगलने या चॅनेलची नावे उघड केलेली नाहीत. आपल्या त्रैमासिक बुलेटिनमध्ये गुगलने ही माहिती दिली आहे. 




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post