जेईई - नीट च्या परिक्षा पुढे ढकला ; शहर जिल्हा काँग्रेसची निदर्शने



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - कोविड -19 साथ रोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE / NEET च्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलणे अपेक्षित असतांना देखील अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेण्याचा घाट मोदी सरकार घालत आहे. मोदी सरकार मधील शिक्षण खाते विद्यार्थांच्या जीवाचा खेळ मांडू पाहत आहे. लाखो विद्यार्थी याविरोधात आवाज उठवत असून विद्यार्थांच्या जीवाशी खेळण्याचा कुठलाही नैतिक अधिकार केंद्रातील मोदी सरकारला राहिलेला नाही असे प्रतिपादन माजी महापौर व माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केले.

शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले कि, मोदी सरकार करीत असलेले हे कृत्य काँग्रेस पक्ष कधीही खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांचा आड भाजपा राजकारण करीत आहे. या परीक्षांना हजर राहण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. यामुळे पालक वर्ग देखील चिंतीत सापडला आहे. मोदी सरकार सह केंद्रातील शिक्षण खाते झोपेत असून त्यांना जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेश अध्यक्ष, महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात साहेब,आ.डॉ.सुधीर तांबे साहेब व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरू असून आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस च्यावतीने जेईई - नीट च्या प्रवेश परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी आयकर भवन कार्यालयाच्या आवारात मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आले.

यावेळी महिला काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, रजनी ताठे, जरीना पठाण, शारदा वाघमारे,भिंगार काँग्रेसचे रिजवान शेख, सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, शिल्पा दुसुंगे, हेमलता घाटगे, अड. अजित वाडेकर, एन.एस.यु.आय अध्यक्ष दानिश शेख, चंद्रकांत उजागरे, प्रवीण गीते, आदित्य बर्डे, राहुल पवार, शंकर आव्हाड, मुबीन शेख आदी उपस्थित होते.

यावेळी आंदोलन करताना सोशल डिस्टन्स चे पालन करून तसेच मास्क घालून कोरोनासंदर्भात सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी, नियमांचे पालन करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post