सामूहिक प्रयत्न केल्यास कला केंद्र सुरू होतील - सुरेश आवटी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर :-  संघटनेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न केले तर राज्यातील कला केंद्र लवकर सुरू होतील, असे प्रतिपादन मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश आवटी यांनी केले. महाराष्ट्र सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र मालक संघटनेच्या वतीने केडगाव चौफुला येथील न्यू अंबिका सांस्कृतिक व लोकनाट्य कला केंद्रात आयोजित राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते.

संघटनेचे अध्यक्ष केशरबाई घाडगे, डॉ.अशोक जाधव, बाळासाहेब काळे, राजाभाऊ चौधरी, श्रीनिवास आकनगिरे, रत्नकांत शिंदे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांच्यासह विविध जिल्ह्यातील कला केंद्रांचे संचालक यावेळी उपस्थित होते.

कोरोना महामारीचे संकट व लॉक डाऊनमुळे गेल्या ५ महिन्यापासून राज्यातील सर्व कलाकेंद्र बंद आहेत. त्यामुळे कला केंद्र मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नृत्यांगणा, गायिका, वादक, सोंगाडे हे बेरोजगार झाले आहेत.  कला केंद्रे ओस पडली आहेत. कलावंतांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे सर्व कला केंद्रे लवकरात लवकर सुरू व्हावी याबाबत चर्चा करण्यात आली. 

अशोक जाधव म्हणाले की, कला केंद्र सुरू करावेत या मागणीसाठी राज्यात एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, स्थानिक लोकप्रतिनिधी व पालक मंत्र्याना देण्यात येईल. 

अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, कला केंद्र सुरू करण्यासाठी जो पर्यंत आपण रस्त्यावर उतरून आपले म्हणणे मांडणार नाहीत, तोपर्यंत आपली कोणी दखल घेणार नाही. त्यामुळे आपण एकाच दिवशी राज्य पातळीवर सामूहिक आंदोलन केले तर त्याची दखल शासनाला घ्यावी लागेल. 

बाळासाहेब काळे म्हणाले की, कोरोना लॉक डाऊनचे सर्व नियम व अटींचे पालन करून कला केंद्राचा व्यवासाय करण्यास आम्ही तयार आहोत. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊ. 

केशरबाई घाडगे म्हणाल्या की, भारतीय संविधानाने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला आहे. आपली कला दाखवून जगणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. आपण शासनाचा महसुली कर भरतो आणि अधिकृत परवाने घेऊनच मनोरंजनाचा व्यवसाय करतो. त्यामुळे लॉक डाऊनमुळे बंद असलेला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण शासनाला विनंती करू.

आपल्या मागनीबाबत चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे वेळ मागू व आपली भूमिका मांडू. 

राजाभाऊ चौधरी यांनी प्रास्ताविक  व सूत्रसंचालन केले. यावेळी रत्नाकर शिंदे, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीस सुरेखाताई पवार (सणसवाडी), राजुशेठ तांबे (पुणे), जगदिश कोरहाळे (नारायणगाव), संतोष बडे (नारायणगाव), शिवाजी परांडे (धानोरी), अनिल मोडक(जेजुरी), रेखाताई काळे (चौफुला), मंदाताई चंदन (जामखेड), उमाताई जाधव (जामखेड), लता जाधव (जामखेड), गणेश भानवसे (जामखेड), किरण जाधव (लोदगा), बापूसाहेब कारंडे (वाठार), शिवाजीराव डवरी (गोकुळशिरगाव), राजाभाऊ माळी (चोराखळी),  काका कदम (पनवेल), बापूसाहेब यादव (वेडे, सातारा) , मीनाताई काळे (भोकर फाटा) , विद्या काळे (भोकर फाटा) , मंगल अंधारे (वारंगा फाटा), शिल्पा अंधारे (केज),  दिलीप अंधारे (गंगाखेड), बापूसाहेब मुसळे (सिन्नर), किरण जाधव (लोदगा) , उत्तमराव वरुडे (रेणापूर), बाबासाहेब घाटे (आळणी), संदिप कोकाटे (आळणी फाटा), सुनिल शेळके (एडशी), निर्मला जाधव (चोराखळी), बेबीताई मुसळे (बाभळगाव), नंदूशेठ वाबळे (सोलापूर), राजुशेठ तांबे (पुणे), राजश्री जाधव (जामखेड), विशाल जाधव (जामखेड), कुमार पवार(परीटे), अनिल पवार, संतोष पवार, अमोल अंधारे, रवी अंधारे (जामखेड), बाळासाहेब घावटे (सुपा), तुकाराम शेरकर (सुपा), चंद्रकांत मडंगे, किसन जाधव (मोडलिंब), जगन्नाथ घाडगे (मोडलिंब), अभयकुमार मुसळे (मोडलिंब), मंगलताई (बार्शी), गजाला ताई (बाळे), अशाबाई जाधव (वेनेगाव फाटा), शोभाताई तारने (इस्लामपूर), शिंदे बुवा (जयसिंगपूर), डॉ. ढाकणे (केज), सुंदर मोरे (बीड), भांगे पाटील (कुंबेफळ) आदी यावेळी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post