माय अहमदनगर वेब टीम
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२०. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दिवशी चंद्र मकर राशीत असेल. ऑगस्टचा महिना श्रावणातील व्रते, गणेश चतुर्थी अशा उत्सवी वातावरणात मंगलमय गेला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस काही राशींच्या व्यक्तींच्या खर्चात वाढ होईल, तर काही राशींच्या व्यक्तींना समस्यांचा सामना करावा लागू शकेल. कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा असेल आजचा दिवस? जाणून घेऊया...
मेष : तिखट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन टाळा. दुसऱ्यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत होईल. जुन्या मित्राची अचानक भेट होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
वृषभ : इंटरव्ह्यूमध्ये यश येईल. नोकरी. व्यवसायात मानाचा दर्जा मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. प्रलंबित कामे प्राधन्याने पूर्ण करू शकाल. व्यवसाय, व्यापार, उद्योगाशी निगडीत व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीतील योजना अमलात आणण्यापूर्वी सारासार विचार करणे हिताचे ठरेल.
मिथुन : आपली हेकेखोर वृत्ती बाजूला ठेवा. आपली बुद्धिमत्ता लोकांना दिसून येईल असे कार्य घडवा. अनेक कामांचा निपटारा शक्य. मात्र, घाईने केलेली कामे समस्या निर्माण करू शकतात. कामाचे व्यवस्थापन, नियोजन करणे हिताचे ठरेल. कामांचा प्राधान्यक्रम यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करणारा ठरू शकेल. आजचे काम आजच पूर्ण केल्यास फायदा मिळेल.
कर्क : भागीदारीमध्ये फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे एकदम करावी लागण्याची शक्यता. कार्यक्षेत्र आणि कुटुंबातील जबाबदाऱ्यांमध्ये योग्य ताळमेळ साधून कामे पार पाडणे हिताचे ठरतील. आजच्या दिवसात कोणत्याही वादविवादात पडू नका. व्यवसाय, व्यापारातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.
सिंह : दुसर्यास समजावून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी पडू नका. वाहन नादुरुस्तीच्या समस्येचा सामना करावा लागू शकेल. प्रतिकूल परिस्थितीत संयम बाळगून व्यवहार करणे हिताचे ठरेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक वार्ता मिळू शकेल. सेवाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात मान, सन्मान प्राप्त होतील.
कन्या : भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊनच काम करा. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. दिनक्रम व्यस्त राहण्याची शक्यता. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची अनमोल साथ लाभेल. गुंतवणुकीसंदर्भात निर्णय घेताना ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
तुळ : महत्वाकांक्षी स्वभाव लोकांना दिसून येईल. इतरांशी व्यवहाराने वागा. समस्यांचे निराकरण सक्षमतेने करू शकाल. मात्र, काही ना काही सारखं घडतंय, असे वाटेल. निराश न होता संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल. कामावर लक्ष केंद्रीत करावे. अन्यथा विरोधकांचा त्रास सहन करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या रुसव्याला सामोरे जावे लागेल. सारासार विचार आणि समजुतीने केलेला व्यवहार उत्तम ठरेल.
वृश्चिक : अति साहस करू नका. दुसऱ्याची मानसिकता समजून घ्या. नवीन नोकरी असणाऱ्या व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागू शकेल. जबाबदारी पार पाडताना कठीण परिस्थिती उद्भवू शकेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता. मात्र, अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज केलेली बचत भविष्यात उपयोगी पडू शकेल. सासरच्या मंडळींकडून तक्रारीचा सूर येऊ शकेल.
धनु : आपल्या अति प्रेमळ स्वभावाचा लोकांना गैरफायदा घेऊन देऊ नका. आपल्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घर आवरण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडू शकते. नियोजन आणि व्यवस्थापन करून केलेली वाटचाल समाधान प्रदान करेल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. भावंडांमधील नातेसंबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मुलांकडून काही शुभवार्ता मिळतील.
मकर : आपल्या शांत व गंभीर स्वभावाचा आपल्यालाच फायदा होईल. आत्मविश्वास उंचावेल असे काम होईल. वर्क फ्रॉम होम करताना दिनक्रम व्यस्त राहण्याची शक्यता आहे. कदाचित वरिष्ठ अधिकारी कार्यालयात पाचारण करू शकतील. नाइलाजाने काही कामे पार पाडावी लागतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. दिवसाच्या उत्तरार्धात धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त ह
Post a Comment