माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने क्रांती चौकात गत दोन दिवसांपासून ठिय्या व निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी गोंधळ जागार घालण्यात आला. संभळ, तुणतुणे, डफावर गाणी गाणे व त्यावर मुरळीचा डान्सने या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले व काही वेळ मनोरंजन देखील केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गोरगरीबांना प्रमुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. मात्र, त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले गेले. कोपर्डी अमुनाष घटनेनंतर सकल मराठा समाजाच्या सयमाचा बांध फुटला व ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लाखो महिला पुरुष मराठा बांधव रस्त्यावर उतरले. त्याची सुरुवात औरंगाबादेतून २०१६ मध्ये क्रांती चौकातून व मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली मुक मोर्चाने झाली होती. त्यानंतर ५८ मुक मोर्चे निघाले. यामुळे भाजप शिवसेना सरकार हदरून गेले होते. सर्व मागण्या मान्य करून त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात अंमलबजावणी संथगतीने होत आहे. अनेक मागण्यांची पूर्तता झालेली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी मुकऐवजी मराठा क्रांती ठोक मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली. ४२ मराठा तरुणांनी आत्मबिलदान दिले. यामुळे वातावरण आणखीन ढवळून निघाले. महाराष्ट्र, महानगर बंद आंदोलनाने रान उठवले. सत्ता परिवर्तन आणि कोरोना संसर्गामुळे काही दिवस आंदोलन बंद पडले होते. समस्या कायम असल्याने अशा परिस्थितीतही मराठा समन्वयकांनी सरकारला जाग करण्यासाठी ठिय्या आंदोलन, गोंधळ जागर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
Post a Comment