'त्या' चर्चेचा तपशील शेतकर्‍यांसमोर मांडणार ; खा.डॉ. सुजय विखे पाटील




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - के. के. रेंजबाबत गोंधळाचे वातावरण असून राहुरी व पारनेर येथे लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या सर्व पार्श्‍वभूमीर खासदार सुजय विखे पाटील यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेत अनेक खुलासे आणि माहिती मिळाली आहे. संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांशी केलेल्या चर्चेचा सर्व तपशील शेतकर्‍यांसमोर मांडून त्यातील वस्तूस्थिती सांगणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 
 
के. के. रेंजसाठी भूसंपादन झाल्यानंतर लष्कराच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त जमिनीला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ४० वर्षापासून रेड झोन असताना अतिरिक्त जमीन संपादन लष्कर करणार का? अतिरिक्त जमिनीची लष्करास आवश्यकता आहे का?  व यापूर्वी जाहीर झालेल्या रेडझोन बाबत काय भूमिका आहे, याबाबत खासदार डॉ. सुजय विखे पाटील व त्याच्याबरोबर असलेल्या शिष्टमंडळाबरोबर संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांची विस्तृत चर्चा केली.
भारतीय सैन्याचे लष्करप्रमुख मेजर जनरल नरवणे यांची भेट घेऊन खा. विखे पाटील यांनी चर्चा केली. जोपर्यंत राज्य सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत लष्करी कवायती व सर्वेक्षण थांबवावे, अशी विनंती खा. विखे पाटील यांनी लष्कर प्रमुखांना केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post