अनिलभैया असते तर आज नगरमध्ये जनता कर्फ्यू लावला असता



कोरोनाचा कहर पुन्हा वाढतोय.. प्रशासन मात्र ढिम्मच..

शहरात  14 दिवसांचा जनता कर्फ्यू करा - सुभाष मुथा

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर -  कोरोनाचा कहर पुन्हा वाढताना दिसतोय.. रोज नवे रुग्ण  वाढताहेत.. बळींची संख्या 230 वर पोहचलीय. लाखो रुपये मोजुनही रुग्णांना बेड  व्हेंटिलेटर्स सुविधा मिळत नाहीत . एकुणच शहराची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्यापुर्वी कोरोनाची साखळी मोडण्यासाठी 14 दिवसांचा लॉकडाऊन - जनता कर्फ्यू जारी करण्याची मागणी,  व्यापारी नेते सराफ सुवर्णकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि जैन समाजाचे प्रमुख सुभाष मुथा  यांनी केली आहे.

कोरोना प्रादुर्भावात  शहराने 230 निष्पाप जीव गमावले. शहराचे माजी आमदार, व्यापार्यांचा कोहिनूर आणि मान्यवर  गेले.  शहरात पुन्हा गांभिर्य वाढत चाललेय. प्रशासन रोज बाधित आणि मृतांची आकडेवारी जाहीर करण्यातच धन्यता मानत आहे. रोज बरे झालेल्या रुग्णांची  आकडेवारी जाहीर करतेय पण या बरे झालेल्या रुग्णांवर प्रशासनाचे लक्ष आहे का? संसर्ग वाढतोय हे शहरात दिसत असताना ही साखळी तोडण्यासासाठी प्रशासनाकडे  कठोर उपाययोजना  आहे का? असा सवाल करुन सुभाष मुथा यांनी  गणेशोत्सव, मोहरमनंतर तातडीने 14 दिवसांचा जनता कर्फ्यू जारी करण्याची आग्रही मागणी सुभाष मुथा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

नगरचे आमदार,खासदार आणि सर्व पक्षांच्या प्रमुखांनी शहरातील परिस्थितीचा विचार करुन या विषयात लक्ष घालावे. हा राजकारणाचा विषय नाही. व्यापार .. व्यवहार .. व्यवसायापेक्षाही आज  लोकांचे जीव सर्वात महत्वाचे  असून  व्यापार होत राहील. कामधंदे पुन्हा सुरु होतील मात्र एकदा गेलेला जीव पुन्हा परत येत नाही. त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  सर्वानी राजकारण दुर ठेऊन या विषयावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याची  गरज असल्याचे ते म्हणाले. आपण अनेक व्यापारी  कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गेले 14 दिवस झाले. म.न.पा.  युनियनचे घरातून काम सुरु आहे. नागरिकांना प्रवेश नाहीय. कर्मचारी आणि सर्वांची सुरक्षा अर्थात जीव महत्वाचे आहेत  असे प्रशासनाला वाटत नाही का? असा सवाल करुन  आज  अनिलभैय्या असते तर  त्यांनीच मुख्यमंत्र्याना साकडे घालून  नगरला जनता कर्फ्यू लावला असता, असे सांगुन मुथा यांनी   उद्धव ठाकरे यांना सर्व नेत्यांनी साकडे घालावे. लोकांचे जीव वाचवण्याचा एकमात्र उपाय म्हणुन जनता कर्फ्यूची  अमंलबजावणी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

सामान्य नगरकर आणि व्यापारी  सर्वच  गेंभीर आहेत.  रुग्णालयात जागा मिळत नाहीय.  सरकारी दवाखाने  म.न.पा. ची मर्यादा स्पष्ट झाली आहे. मंगल कार्यालयात खासगी  कोविड सेंटर म्हणजे आनंदी आनंदच आहे. ग्रामिण भागातील आणि सरकारी दवाखान्यात  अनागोंदी आहे. अमानवीय असे वर्णन लोकप्रतिनिधींनी जाहीरपणे केलेय. उपाय योजना  करण्याबाबत   प्रशासन आणी लोकप्रतिनिधी यांच्यातील मतभिन्नता आणि जाहीर मतभेद   जाहीरपणे समोर आलेत. शहरातील परिस्थिती पाहता सर्वानी गंभीर होण्याची गरज आहे.  पार्थिवदेहांची विटंबणा होतेय, आता तर नालेगावातील लोकांनी अमरधाम गेट बंद करण्याचा  इशारा दिलाय. अमरधाममध्ये जागा मिळणार  नाही, असे चित्र असताना तरी सर्वानी याचा गांभिर्याने विचार करावा. जनता  कर्फ्यूची मागणी आपण विचारपुर्वक केली आहे; यात कुठलाही कोणाचा स्वार्थ नाहीय, यापुढे तरी कोणाचा जीव जाऊ नये.

जिल्ह्यात 12 मार्च ला पहिला रुग्ण आढळून आला. प्रारंभी लॉक्डाऊनमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती.  बाहेरुन -परगावहून येणाार्या रुग्णांचे प्रमाण दिसून येत होते, मात्र लॉकडाउन उठल्यानंतर  बाहेरुन येणार्याचे प्रमाण वाढले. स्थानिक पातळीवर संसर्ग वाढलाय.  मार्चमध्ये 8,  एप्रिल 47,  मे 147, जून 465 तर जुलैै महिन्यात 4973 इतकी म्हणजेच दहापट  तर या ऑगस्टच्या 23 दिवसात 17074 रुग्ण आढळले ; तर आजपर्यंत 231 रुग्ण  मयत झाले.  हा फक्त अधिकृत आकडा आहे. काही नोंदच नसणार्या घरी खासगी दवाखान्यांतील मृतांची नक्की संख्या खासदार पण सांगू शकले नाहीत.  बरे झालेल्या रुग्णांबाबत  योग्य माहिती मिळत नाही.  फक्त ऑगस्ट  महिन्यात 163 रुग्णांनी जीव गमावले.  यातून रुग्ण संख्या आणि मृत्यू रोखण्याचे संकट स्पष्ट होत असताना  केवळ काही लोक आणि नेत्यांची नाराजी नको यासाठी जर सरकार कठोर उपाय करण्याचे टाळत असेल तर  देवपण नगरकरांचे रक्षण करु शकणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post