माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 2019 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी W-GDP (वुमेन्स ग्लोबल डेव्हलपमेंट प्रोस्पेरिटी) उपक्रम सुरु केला आहे.
यामध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी अमेरिकेच्या यूनाइटेड स्टेट एजेंसी फॉर इंटरनॅशनल डेव्हलोपमेंट’ सोबत (USAID) हातमिळवणी केली आहे. यामुळे भारतात डिजिटल लिंगभेद संपविण्यासाठी अंबानी यांच्यासोबत इव्हांका यादेखील एकत्रितपणे काम करणार आहेत.
अमेरिकेचे उपमंत्री स्टीफन बेझगुन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात यूएसएआयडीचे उप-प्रशासक बोनी ग्लिक देखील होते.
या कार्यक्रमास वर्चुअली संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या की, रिलायन्स फाऊंडेशन आणि डब्ल्यू-जीडीपी यूएसएआयडीच्या भागीदारीत एकत्र येत असल्याचे जाहीर करताना मला आनंद आणि अभिमान वाटतो.
2020 मध्ये आम्ही एकाच वेळी डब्ल्यू-जीडीपी वूमनकनेक्ट चॅलेंज भारतभरात सुरू करू. भारतातील लिंगभेद आणि डिजिटल विभाजन या दोन्ही गोष्टींवर आम्हाला काम करावयाचे आहे.
जेव्हा महिला जागृत होतात तेव्हा कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग शोधतात. जिथे सर्वाना समानता प्रदान केली जाते अशा राष्ट्रालाच खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र म्हटले जाते असेही त्या म्हणाल्या.
रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने डब्ल्यू-जीडीपी संपूर्ण भारतभर वूमन कनेक्ट चॅलेंजची सुरूवात करणार आहे.
हे आव्हान भारतातील लैंगिक भेदभाव दूर करेल तसेच भारतीय महिलांना व्यवसायात उतरण्यासाठी प्रोत्साहन देईल असे सांगितले जात आहे.
नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डब्ल्यू-जीडीपी फंड तयार केला गेला. याचे चांगले परिणाम दिसण्यासाठी अमेरिकन सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संसाधने आणि तज्ञ मदत करत असल्याचे इवांका म्हणाल्या.
Post a Comment