माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने पुन्हा एकदा बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. त्यांनी आज (दि.19) बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. त्यांच्या मते आयपीएलच्या प्रमुख प्रायोजक कंपनीतही चीनची हिस्सेदारी आहे. त्यांनी अध्यक्ष सौरभ गांगुली यांना 'आयपीएलच्या नव्याने निवडण्यात आलेल्या ड्रीम 11 या मुख्य प्रायोजक कंपनीतही चीनची हिस्सेदारी आहे. यामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. ड्रीम 11 कंपनीत टेनसेंट ग्लोबल या चायनिज कंपनीची महत्वाची हिस्सेदारी आहे.' या आशयाचे पत्र लिहिले.
सीएआयटीने 'ड्रीम 11 कंपनीला मुख्य प्रायोजक करणे हे भारतीय लोकांच्या चीनविरुद्ध असलेल्या भावनांकडे दुर्लक्ष करण्यासाठीची एक पळवाट आहे असे आमचे मत आहे.' असे सांगितले. सीएआयटी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आघाडीवर आहे.
ड्रीम 11 ने मंगळवारी झालेल्या आयपीएल मुख्य प्रायोजक पदाची बोली जिंकली होती. त्यांनी ही बोली 222 कोटीला जिंकत चायनिज मोबाईल फोन कंपनी व्हिवोला रिप्लेस केले. आता ड्रीम 11 ही दोन वर्षे तरी आयपीएलची एक प्रायोजक राहणार आहे. सीमेवरील भारत आणि चीनमध्ये घडलेल्या हिंसक झडपेच्या घटनेनंतर व्हिवोची 440 कोटी प्रती वर्षाची डील रद्द केली होती.
भारतातील कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचा आयपीएल ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार आहे. ड्रीम 11 मध्ये गुंतवणूक केलेल्या चायनिज कंपनी टेंनसेंट बाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत पण, बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की ही हिस्सेदारी 10 टक्क्याच्या आत आहे. ड्रीम 11 ही एक भारतीय कंपनी असून ती हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी स्थापन केली आहे.
Post a Comment