माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन नाईक यांनी केली आहे. नाईक यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटात गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. स्वत: अमित शहा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
Post a Comment