माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल. @CMOMaharashtra या ट्विटर अकौटवर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परिक्षेची तारीख बदलण्यात आली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परिक्षा १३ सप्टेबरला होणार होती. नंतर त्यात बदल करण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार ही परिक्षा २० सप्टेंबरला होणार होती. मात्र, आता पुन्हा एकदा आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. पण, नवीन तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तरी नवे वेळपत्रक लवकरच जाहीर केले जाईल अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.
Post a Comment