आज 566 कोरोना बधितांची नोंद

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे  आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३६५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९८, अँटीजेन चाचणीत २३४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७८, श्रीरामपूर ०१,  कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर ०३, अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०१, जामखेड ०५, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.



अँटीजेन चाचणीत आज २३४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०४, संगमनेर १७, राहाता ०९, पाथर्डी १९, नगर ग्रामीण २५, श्रीरामपुर १९, नेवासा १४, श्रीगोंदा १८, पारनेर ११, अकोले ०८, राहुरी ०५, शेवगाव ०९, कोपरगाव ५०, जामखेड १३ आणि कर्जत १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २३४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४१, संगमनेर  १४, राहाता ०६, पाथर्डी ०४,  नगर ग्रामीण २०,  श्रीरामपुर १२, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०३,, पारनेर ०८, अकोले ०५, राहुरी ०७, शेवगाव ०१, कोपरगांव ०६ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज ४२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर २९, राहाता ०९, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३७, श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट १४, नेवासा १३, श्रीगोंदा १९, पारनेर ३०, राहुरी ०७, शेवगाव १२, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या: १३४७८*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:३३६५*


*मृत्यू: २३१*


*एकूण रूग्ण संख्या:१७०७४*


*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*


*STAY HOME STAY SAFE*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*


*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post