खा.नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास; नागपूरहून मुंबईला हलवले

 


माय अहमदनगर वेब टीम

नागपूर - अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तातडीने मुंबईला हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना अमरावतीहून नागपूरच्या येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

नागपुरात दाखल करण्यापूर्वी सात दिवस अगोदर त्या कोरोनाबाधित झाल्याने अमरावतीत तेथे गृह विलगीकरणात होत्या. नागपुरातील वोकार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार नवनित राणा यांना तात्काळ मुबई च्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष रुग्‍णवाहिकेतून खासदार नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा नागपुरहून मुबईकडे रवाना झाले आहेत. 

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने आमदार रवी राणा यांच्यावरही नागपुरातील वोकार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र नवनित राणा यांच्यासमवेत रवी राणा हे सुध्दा मुंबई करीता रवाना झाले आहेत. मुबंई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत, अशी माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी सोशल मीडियावर प्रसारीत केली आहे.





0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post