अहमदनगर- सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मधील विद्यार्थ्यांनी कु. सायली श्रीकांत गाडगे हिने दहावीच्या शालांतर परीक्षेत 93.60टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिला या परीक्षेसाठी सेक्रेड हार्ट कॉन्वेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. सायली ही श्रीकांत गाडगे व मंगल गाडगे यांची मुलगी असून शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांची पुतणी आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षक भारती चे आमदार कपिल पाटील, शिक्षक भरतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, अहमदनगर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप तसेच सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
Post a Comment