माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - श्री साईबाबांच्या मंदिरासह राज्यातील इतरही प्रार्थना स्थळे खुली करावीत, या मागणीसाठी शिर्डीत माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'दार उघड उध्दवा दार उघड' हे घंटानाद आंदोलन साई मंदिर परीसरात करण्यात आले.
आंदोलनात खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, प्रकाश चित्ते , नगराध्यक्ष ,नगरसेवक, तसेच वारकरी,व्यवसायिक, स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झाले होते
Post a Comment