अमेरिकेची हेरगिरी करणारी विमाने घुसली चीनच्या हद्दीत

 


माय अहमदनगर वेब टीम

बीजिंग/वॉशिंग्टन - अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. अमेरिकेची दोन अ‍ॅडव्हान्सड् यू-2 स्पाय प्लेन (हेरगिरी करणारी विमाने) काही दिवसांपूर्वी चीनच्या हद्दीत घुसली होती. त्यांनी चीनच्या सैन्य संचलनाचे रेकॉर्डिंगही केले, असा आरोप चीनने केला आहे. 

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्‍ता वु क्विन म्हणाले की, अमेरिकन नौदलाच्या दोन लढाऊ विमानांनी उत्तर चीनमधील सैन्य संचलनाचे अनेक तास  निरीक्षण केले आहे. त्यानंतर ही विमाने हिंद महासागरातील त्यांच्या तळावर परतली; पण त्यामुळे आमच्या प्रशिक्षणावर परिणाम झाला. अमेरिकेने दोन्ही देशांतील कराराचा भंग केला आहे. अमेरिकेची ही कृती धोकादायक आहे. जर ते चिनी हद्दीत घुसले तर सैन्य झटापट होऊ शकते. कालांतराने ती वाढूही शकते. दरम्यान, गेल्या महिन्यातही अमेरिकेची दोन लढाऊ विमाने शांघायपासून 75 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचली होती. 

हेरगिरीर्‍या विमानाची वैशिष्ट्ये

यू-2 स्पाय एयरक्राफ्ट हे अमेरिकेचे सर्वोत्तम हेरगिरी विमान आहे. 70 हजार फूट उंचीवरूनही जमिनीवरील हालचाल टिपता येते. छायाचित्रे आणि एचडी व्हिडीओ बनवण्याचीही यांची क्षमता आहे. विमानरोधी क्षेपणास्त्रांच्या तावडीत हे विमान सापडत नाही. 

नियम मोडला नाही : अमेरिका 

दरम्यान, अमेरिकेने चीनच्या आरोपांचे खंडन केलेले नाही. उलट आम्ही कुठलाही नियम तोडला नसल्याचे म्हटले आहे. आम्ही आमची मर्यादा सांभाळून काम केले. कुठलाही नियम मोडला नाही. या आधीही हिंद महासागर क्षेत्रात आम्ही काम केले आहे, यापुढेही करत राहू, असे अमेरिकेने म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post