माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. काल त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरुच होते.
मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. आज त्यांच्या प्रकृतीचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या मुलगी श्रर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे चौकशी केली. ते लवकर बरे व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
प्रणव मुखर्जी यांचे ट्विट
प्रणव मुखर्जी यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला क्वारंटाईन व्हावे, तसेच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे.
Post a Comment