तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार ; जाणून घ्या

 

माय अहमदनगर वेब टीम 

गुरुवार 13 ऑगस्ट रोजी रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ५

आज राशीच्या धनस्थानातील चंद्र धनाची वृद्धीच करेल. गृहिणींना काटकसर करण्याची गरज नाही.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : १

तुम्ही आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. अनपेक्षितपणे एखाद्या प्रिय व्यक्तीचा कॉल येईल.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ३

मनसोक्त खर्च केलात तरी आज पैशाची कमतरता भासणार नाही. काहीजण सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेणार आहेत. गृहिणी मौल्यवान खरेदी करतील.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४

प्रचंड उत्साहात आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. जोडीदारास आज एखादे सरप्राइझ गिफ्ट द्याल.

सिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : ६

आज नोकरीत वरिष्ठांकडून काहीसे दडपण जाणवेल. आपल्या कामाव्यतिरीक्त फार खोलात शिरू नका.

कन्या : शुभ रंग : निळा|अंक : ७

व्यावसायिक मंडळींची पैशाची आवक चांगली असेल. अर्धवट उपक्रम नव्यानेे सुरू करता येतील.

तूळ : शुभ रंग : हिरवा|अंक : २

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकलले तर बरे होईल. आज वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस थारा नको.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

व्यावसायिक अडचणींवर जिद्दीने मात कराल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मोलाचा असेल.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागेल. आज काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ४

आर्थिक आवक चांगली राहील. मुलांच्या वाढत्या मागण्या हौशीने पुरवाल. त्यांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

मनोबल व आत्मविश्वास वाढेल. पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येतील. यथाशक्ती दानधर्म कराल.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : २

सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आज कुवतीबाहेर जबाबदाऱ्या मात्र स्वीकारू नका. व्यसने टाळावीत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post