येस बँक ठेवी प्रकरणी दोषी; विद्यापीठाचा अधिकारी सक्तीच्या रजेवर

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मुंबई विद्यापीठाची सिनेट बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. येस बँकमध्ये १४० कोटींच्या ठेवलेल्या ठेवीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर त्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल पटलावर ठेवण्यात आला. सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संबंधित व्यक्तीचा गुणवंत अधिकारी पुरस्कार परत घेण्यात आला आणि सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.

सदस्यांनी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट २०१६ मधील कलम ९४ (२)अंतर्गत गठीत केलेल्या समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. १४० कोटींच्या ठेवीचा प्रकार घडत असताना फायनान्स आणि अकाउंट समिती शांत का होती? हे प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी चौकशी टप्पा २, म्हणजेच संबंधित व्यक्तीवर एफआयआर नोंदवून त्याच्याकडून या प्रकरणांमध्ये कोण कोण व्यक्ती समाविष्ट आहेत यांचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून यातील अधिक सत्य बाहेर काढावे, अशी मागणी युवासेनेचे प्रदीप सावंत, बुक्टूचे डॉ.गुलाबराव राजे यांनी केली. आदर्श कर्मचारी पुरस्कारही स्थगित करण्यास भाग पाडले.


सिनेट सदस्यांचा आवाज म्यूट

विद्यार्थ्यांच्या सोईसुविधा पुरवणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, शैक्षणिक कार्यक्रम राबवणे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसंदभार्तील प्रश्न विद्यापीठांच्या सिनेटमध्ये सोडवण्यात येतात. परंतु आभासी पद्धतीने झालेल्या सिनेट सभेत सदस्यांचा आवाज ‘म्यूट’ करण्यात आला, तर प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘हॅण्ड रेझ’ पर्यायही वारंवार नाकारण्यात येत होता. त्यामुळे आवाज दाबण्याचा प्रकार कुलगुरूंकडून होत असल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post