माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून करोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटलेे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना करोना संक्रमण होऊ शकते असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, अशा लोकांची वेगाने तपासणी करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. आरोग्य मंत्राल्याने म्हटल्याप्रमाणे, यामुळे मृत्यू दर कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा सल्ला दिला आहे.
Post a Comment