माय अहमदनगर वेब टीम
बुधवार 26 ऑगस्ट रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
मेष: शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
भागी दारी व्यवसायात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्याचे व्यवहार रोखठोक असावेत.
वृषभ: शुभ रंग : तांबूस | अंक : ९
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. छान दिवस.
मिथुन : शुभ रंग : नारिंगी|अंक : ४
आज कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. काही कामे आज नि:स्वार्थीपणे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.
कर्क : शुभ रंग : जांभळा|अंक : ४
कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.
सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून घडेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल.
कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : २
आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी आज झाकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.
तूळ : शुभ रंग : पांढरा|अंक : ५
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होणार आहे.
वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ३
आज मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळ जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धावू नका.
धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : १
आज पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे.
मकर : शुभ रंग : पिस्ता|अंक : ७
योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. मित्र योग्यच सल्ले देतील.
कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. कुसंगती टाळणे गरजेचे आहे.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
कार्यक्षेत्रात वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
Post a Comment