राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नी-मुलीला कोरोनाची लागण

 


माय अहमदनगर वेब टीम

इंदापूर - महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे निवडून आलेले आमदार यशवंत माने यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशवंत माने हे मुळचे इंदापूरचे आहे. यशवंत माने यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आणि घरच्या सदस्यांची यादी करण्यात आली आहे. तसंच जर कुणी संपर्कात आले असेल तर त्यांनी क्वारंटाईन व्हावे किंवा आरोग्य प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन माने यांच्याकडून करण्यात आले आहे.

त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि सोळा वर्षाच्या मुलीसह त्यांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या आमदार माने यांचे कुटुंब हे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर स्वीय सहाय्यक इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील कोविड रुगाणालयात उपचार घेत आहेत. यावेळी, ‘माने यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी प्रकृती उत्तम आहे. सर्वांनी आपआपली काळजी घ्यावी. वेळीच तपासणी करावी,’ असा सल्ला आमदार माने यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post