माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकेत America ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुक आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील डेमोक्रेटिक पार्टीकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी जोए बिडेन Joe Biden यांची निवड झाल्यानंतर आता उपराष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस Kamala Harris यांची निवड झाली आहे. त्या भारतीय-जमैकन मूळच्या अमेरिकन आहेत.
डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जोए बिडेन यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, "मला सांगताना अभिमान वाटतो आहे की, मी कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड केली आहे. शूर योद्धा आणि अमेरिकेची एक उत्कृष्ट लोकसेवक कमला हॅरिस माझी सहकारी असेल."
कॅलिफोर्नियाच्या खासदार असलेल्या कमला हॅरिस या आधी जोए बिडेन यांच्यासोबत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला आहे. त्यांच्या आईचा जन्म भारतात झाला होता तर वडील जमैकन आहेत.
कमला हॅरिस यांनी ट्विट करत बिडेन यांचे आभार मानले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, "बिडेन अमेरिकेच्या लोकांना एक करु शकतात. कारण ते संपूर्ण जीवन आपल्यासाठी लढले. राष्ट्राध्यक्ष म्हणून ते एक असा अमेरिका बनवतील जो आपल्या आदर्शांवर खरा उतरेल. मी माझ्या पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून त्यांच्यासोबत असल्याचा मला अभिमान वाटतो आहे. त्यांना माझा कमांडर-इन-चीफ बनवण्यासाठी जे काही कराव लागेल ते मी करेल."
पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय-अमेरिकी Indian- American महिलेला मुख्य पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. जर कमला हॅरिस निवडणूक जिंकतात तर उपराष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील.
Post a Comment