माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे २ पोलीस कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून, एकूण ३४६ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्तव्य बजावताना आतापर्यंत राज्यात १४८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये १५ अधिकारी तसेच १३३ कर्मचा-यांचा समावेश आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत १४६४१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये १५५५ अधिकारी तर १३०८६ कर्मचा-यांचा समावेश आहे. सध्या राज्यात २७४१ पोलीस कर्मचारी हे कोरोना ग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात ३५३ पोलीस अधिकारी तर २३८८ कर्मचा-यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात ११७५२ पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये ११८७ पोलीस अधिकारी तर १०५६५ कर्मचा-यांचा समावेश आहे.
Post a Comment