राज्यात दिवसभरात १४ हजार २१९ कोरोनामुक्त

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई :  आज राज्यात तब्बल १४ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

आज राज्यात ११ हजार ०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ इतकी झाली आहे. तर, राज्यात सध्या १ लाख ६८ हजार १२६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ चाचण्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात आज २१२ करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या २२ हजार ४६५ इतका झाला आहे. सध्या राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ व्यक्ती होम क्वारंटाइनममध्ये आहेत. तर, ३३ हजार ९२२ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



(आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक मनपा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post