माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नसली तरी येत्या काही महिन्यांंमध्ये मुंबईकरांच्या कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर जेव्हा लोकलची वाहतूक पूर्वपदावर येईल,त्यावेळी सोशल डिस्टन्सिंंगचे पालन शक्य व्हावे म्हणून रेल्वे प्रशासन राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांसोबत कार्यालयीन वेळेत बदल करण्यावर चर्चा सुरू आहे. या संदर्भात गेल्या जूनमध्ये एक बैठक झाली. लवकरच दुसरी बैठक होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे डीआरएम जे.व्ही.एल.सत्यकुमार यांनी बुधवारी दिली.
15 जूूनपासून अत्यावश्यक सेवेतील सुमारे तीन लाख कर्मचारी लोकल प्रवास करत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर त्यांच्यासाठी दिवसाला 700 फेर्या चालविण्यात येतात. या गाड्यांनाही प्रचंड गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी तर एकमेकांना चिकटून उभे राहून प्रवास करावा लागतो परिणामी लोकलमध्ये आताच शारीरिक अंतराचे तीनतेरा वाजले आहेत. लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सर्व सामान्य मुंबईकरांसाठी सुरू होईल तेव्हा उसळणार्या गर्दीची कल्पनाही न केलेली बरी. या रेटारेटीत कोरोनाचा जोर वाढू नयेम्हणून गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असलेला कार्यालयीन वेळा बदलण्याचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आले तरी प्रवासादरम्यान प्रवाशांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर ‘स्टॅगर टाईमिंग’ हाच पर्याय असून त्यावर काम सुरू असल्याचेदेखील सत्यकुमार यांनी सांगितले.
सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी लोकलच्या फेर्या चालविण्यात येत आहेत.या कर्मचार्यांना प्रवासाकरिता ई-पास देण्यात येत आहे. सध्या सुमारे दीड लाख कर्मचार्यांना ई-पास देण्यात आले आहेत. तर ज्यांना ई-पास मिळाला नाही, ते कर्मचारी आपल्या कार्यालयीन ओळखपत्रावर प्रवास करीत आहेत.तसेच लोकलमध्ये कोणीही प्रवेश करू नये याकरिता स्थानकातील प्रवेश गेटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लोकलची वाहतूक पुर्णपणे सुरू झाल्यानंतरही प्रवेश गेटवर त्याच पद्धतीने निबर्ंध घालण्यात येणार आहेत. तसेच यापुढे मेट्रोप्रमाणे लोकल स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे.त्यासाठी सप्टेंबर महिन्यात चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर क्यू-आर आधारित तिकीट गेट बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या स्थानकांवर ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.
सरकार, रेल्वे अन् महापालिकांच्या बैठका
खासगी आणि सरकारी दोन्ही कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा बदलण्यात येतील.
बदलत्या कार्यालयीन वेळेनुसार लोकलचे वेळापत्रकही बदलण्यात येईल.
सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी पालिका वॉर्ड ऑफिसची मदत घेण्यात येत आहे. त्या-त्या परिसरातील कार्यालयांची माहिती घेतली जाणार आहे.
Post a Comment