माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोना महारोगराईच्या संकट काळात चित्रीकरण व्यवसायात असलेल्या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण होण्यास मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने टीव्ही तसेच चित्रपटातील चित्रीकरणासाठी विस्तृत अशी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी या संबंधीची माहिती दिली. चित्रपट तसेच टीव्ही सीरियल्सचे चित्रिकरण या एसओपीचे पालन करीत सुरु करता येईल, असे जावडेकर म्हणाले. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच टीव्ही सीरियल्स तसेच चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी दिली आहे.
शूटिंगच्या सेटवर सर्व ठिकाणी फेस मास्क वापरण्यास ह भैतिक दुरत्व ठेवण्याच्या अटीचे तंतोतंत पालन कलावंतासह कर्मचार्यांना करावा लागणार आहे.चित्रीकरणा दरम्यान कलावंतांना हे नियम लागू होणार नाही. या सूचनांनूसार सीटिंग, कॅटरिंग, क्रू पोझिशन्स, कॅमेरा लोकेशनमध्ये योग्यते अंतरराखावे लागणार आहे.या सोबतच सीटिंग, एडिटिंग रुममध्ये देखील सोशल डिस्टन्सिंगच्या अटीचे पालन करावे लागेल, असे जावडेकरांनी स्पष्ट केले.
मानक कार्यप्रणालीनूसार शूटिंगची स्थाने आणि इतर कामाच्या ठिकाणी योग्य ते अंतर राखले जाणे अत्यंत आवश्यक आहे, असे केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले. या बरोबरच योग्य स्वच्छता, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षात्मक उपकरणांसाठी तर तुदींसह उपायांचा समावेश आहे. कमीत कमी संपर्क, एसओपीमध्ये मूलभूत आहे, असे ट्विट जावडेकर यांनी केले आहे. एकमेकांपासून किमान भौतिक दुरत्वासह हेयरस्टायलिस्टांद्वारे पीपीई, प्रॉप्स शेयर करणे आणि इतरांमध्ये मेकअप याबाबत कलाकारांद्वारे विशेष काळजी घेतली जाणार आहे.
अशी आहे नवीन मानक कार्य प्रणाली!
* कॅमेऱ्या समोरील कलाकार यांना सोडून सर्वांसाठी फेस कव्हर्स,मास्क अनिवार्य
* प्रत्येक ठिकाणी ६ फुटांच्या अंतराचे पालन करावे
* मेकअप आर्टिस्ट, हेयरस्टायलिस्ट्स पीपीईचा वापर करणार
* विग, कॉस्ट्यूम आणि मेकअपची शेयरिंग कमी करावी लागणार
* शेयर करण्याजोग्या वस्तूंचा वापर करताना हात मोजे घालावेत
* माइकच्या डायफ्रामशी थेट संपर्क ठेवू नये
* प्रॉप्सचा वापर कमीत कमी व्हावा, वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक
* शूटिंगवेळी कास्ट अँड क्रू कमीत कमी असावेत
* शूट लोकेशनवर एंट्री/एग्झिटचे वेगवेगळे मार्ग असावेत
* व्हिजिटर्स, दर्शकांना सेटवर जाण्याची परवानगी राहणार नाही
Post a Comment