फक्त एम.एस. धोनी नव्हे, तर पत्नी साक्षीलाही सामावून घेण्यास भाजप उत्सुक

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो राजकारणात जाणार का याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीला सामावून भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासूनच रस दाखवला आहे. २०१९ मध्ये पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून धोनीला नेमण्यास भाजप उत्सुक होता. पण त्या वेळी धोनीने नकार दर्शवला होता.

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर धोनीच्या भाजप प्रवेशाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. धोनीने राजकारणात प्रवेश केला, तर तो कुठल्या राज्यात सक्रिय राहील याचीही चर्चा झाली. धोनी कुटुंबीय मूळचे उत्तराखंडचे आहे. पण माही झारखंडलाच वाढला आणि मोठा झाला. सध्याही तो रांचीचा सुपुत्र म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे रांचीतूनच तो राजकारणाचा श्रीगणेशा करेल, असं बोललं जातं.

फक्त धोनीच नाही तर त्याची पत्नी साक्षी धोनीला तिकिट देण्यास भाजप उत्सुक असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. अर्थात याविषयी कुठल्याही नेत्याने, पक्षाने किंवा खुद्द धोनीने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या फक्त शक्यता आहेत आणि चर्चा आहेत. भाजपने यापूर्वी गौतम गंभीर, राज्यवर्धन राठोड, बबिता फोगट अशा अनेक खेळाडूंना पक्षातर्फे निवडणुकीत उभं केलं. अनेकांना पदं आणि खातीसुद्धा दिली. त्यामुळे धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post