माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका पोर्न स्टारला जवळपास ३३ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. अमेरिकेच्या एका न्यायालयाने याबात आदेश दिला आहे. स्टॉर्मी डॅनियल्स नावाच्या एका पोर्न स्टारच्या म्हणण्यानुसार तिचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे अफेयर होते. मात्र, ट्रम्प यांनी याबाबतचे आरोप फेटाळले आहेत.
एका आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्त वाहिनीच्या अहवालानुसार, ४१ वर्षीय स्टॉर्मी डॅनियल्स हिने ट्रम्प यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. मात्र काही दिवसांनंतर हा खटला रद्द झाला होता. आता न्यायालयाने म्हटले आहे की, खटला सुरू असताना डॅनियल्स हिचे जे आर्थिक नुकसान झाले आहे त्याची भरपाई डोनाल्ड ट्रम्प यांना करावी लागणार आहे.
कॅलिफोर्निया न्यायालयाने ट्रम्प पोर्न स्टार डॅनिअल्सला ३३ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आद्श दिले आहेत. डॅनियल्सच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. स्टॉर्मी डॅनियल्स हिने या निर्णयानंतर ट्वीट केले आहे. ‘होय, आणखी एक विजय!’, असे म्हणत तिने आनंद व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केल्यानंतर स्टॉर्मी डॅनियल्सने आपले आत्मचरित्र लिहिले होते. त्यात तिने ट्रम्प यांच्याशी माझे कसे संबध होते याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर या पुस्तकावरून अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी चचा झडली होती.
Post a Comment