नीट आणि जेईई परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार; राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा निर्णय

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली  - कोरोनाच्या संकटामुळं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २०२० ची जेईई मुख्य आणि नीट (एनईईटी) परीक्षा या पूर्वीच्या तारखांप्रमाणेच होतील अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होतील.

एनटीएने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विद्यार्थ्यांचे हित लक्षात यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांना स्थगिती देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा यासाठी हवाला देण्यात आला आहे.

त्याचबरोबर एनटीएने लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देण्याचे आश्वासनही दिले आहे. तसेच उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार त्यांना पहिलेच केंद्र देण्याचा ९९ टक्के प्रयत्न करण्यात येईल, असेही ठळअने स्पष्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post