माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये कधी नव्हे ते जाहीरपणे नेतृत्व बदलावरुन चर्चा सुरु झाली आहे. देशातील २३ नेत्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षात बदलाची मागणी केली आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पदावरून पायऊतार होण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन नवीन अध्यक्ष निवडावा, असे ज्या २३ नेत्यांनी पत्र लिहिले आहे त्यांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, सोनिया आज (ता.२३) राजीनामा देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्या सर्व अफवा अससल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवेदन प्रसिद्ध करताना राहुल गांधी यांना नेतृत्व स्वीकारण्याची मागणी केली आहे. राहुलजी परत या, फक्त काँग्रेसला नव्हे, तर संपूर्ण देशाला तुमची गरज आहे असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे निवेदनही सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात की, राहुल यांनी सध्या काँग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे. धाडसी, संवेदनशील, बुद्धीजीवी नेत्याची फक्त काँग्रेसलाच गरज नसून संपूर्ण देशाला त्याची गरज आहे. आम्ही राहुलजी यांच्या भावना आदर ठेवून सांगू इच्छितो की, राहुलजी परत या. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही लाखो भारतीयांचा आवाज असू. आम्ही इतिहास घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनात आम्ही देशातील गरीबांसाठी आणि दुर्लक्षितांसाठी काम करू इच्छित आहोत. असे त्यांनी म्हटले आहे
Post a Comment