माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना देशातील व्यावसायिक आणि अव्यावसायिक कोर्सेसच्या सर्व परिक्षा, प्रवेश परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात परिक्षा घ्याव्यात की त्या पुढे ढकलाव्यात असा वाद सुरु झाला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले आहे. या संदर्भात युवा सेनेचे अध्यक्ष मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहिले.
आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा मराठी अनुवाद
आदरणीय सर,
'आपल्या नेतृत्वाखाली देश कोरोना विरुद्ध लढत आहे. देशातील नागरिकही या लढ्यात आघाडीवर आहेत. सर मी तुमचे लक्ष अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांकडे वेधू इच्छितो. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात अजून देशातील अनेक लोक घरातूनच काम करत आहेत, अशा परिस्थितीही देशातील काही विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था परिक्षा घेण्याचा घाट घालत आहेत.
सर, देशातील अनेक राज्यात अजूनतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, हा व्यवहार्य आणि कार्यान्वित करता येण्यासारखा पर्याय नाही. अजूनही रेड झोन आणि दळणवळणावर बंधणे आहेत. विशेष म्हणजे जगभरात जेथे जेथे शाळा कॉलेज पुन्हा सुरु झाले आहेत तेथे तेथे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे आढळून आले आहे.
आपल्या देशात बहुतांश विद्यार्थी हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. जर कुटुंबातील वृद्ध लोकांना कोरोनाची लागण झाली तर मृत्यूचे प्रमाणही वाढण्याचा धोका आहे. जर एखादा पेपरही घ्यायचा म्हटले तर त्यात फक्त विद्यार्थ्यांच्या समावेश असणार नाही तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बरेच लोक समाविष्ट असणार. त्यातील बरेच लोक हे हाय रिस्क मध्ये मोडणारे असणार आहेत.
यामुळे सर माझी आजरपूर्वक विनंती आहे की यामध्ये लक्ष घालून सर्व शैक्षणिक उपक्रम यात देशातील ऑनलाईन, ऑफलाईन परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांचाही समावेश करण्यात यावा.
देशातील अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे मुल्यांकन जवळपास पूर्ण झाले आहे. अंतिम परिक्षेचा या मुल्यांकनावर 10 टक्क्यापेक्षा जास्त फरक पडणार नाही. विद्यापीठाच्या गुणप्रक्रियेत ते उत्तीर्ण होण्याची शक्याता दाट आहे. याचबरोबर आपण आपले शैक्षणिक वर्ष जून - जुलै 2020 पेक्षा जानेवारी 2021 पासून सुरु करण्यावरही विचार करणे आवश्यक आहे. यामुळे कोणताही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
मला खात्री आहे की आपण यात लक्ष घालून कोरोनाच्या मोठा उद्रेक होण्यापासून रोखू शकतो आणि आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात आपले योगदान देऊ शकतो.'
या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी अंतिम वर्ष परिक्षा आणि कोरोना काळातील शैक्षणिक वर्ष या संदर्भात आपली मते मांडली. दरम्यान, युजीसीने अनेक विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर जेईई आणि एनईईटी या सारख्या प्रवेश परिक्षांचेही नियोजन केले आहे. या सर्व निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते. त्यातील जेईई आणि एनईईटी या प्रवेश परिक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती.
Post a Comment