माय अहमदनगर वेब टीम
कोरोना काळात मोरटोरियम(तात्पुरती कर्ज हप्ता स्थगिती) लागू झाल्याने संकटाचा सामना करणाऱ्या बँकांसाठी मोरटोरियमचा अवधी वाढवण्यास नकार देणे आणि एक वेळ कर्जाच्या फेररचनेस मंजुरी दिल्यानंतर आकड्यांतून स्पष्ट दिसते की, बँकांमध्ये मोरटोरियम स्वीकारणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वेगाने घट येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि एचडीएफसी सिक्युरिटीजकडून मिळालेल्या आकड्यानुसार, देशाची सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेत मे-जून दरम्यान २४ टक्के ग्राहकांनी मोरटोरियमची सुविधा घेतली होती, जुलैमध्ये केवळ ९.५ टक्के ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत
जुलैमध्ये केवळ ९.५ टक्के ग्राहक या सुविधेचा लाभ उचलत आहेत. याच पद्धतीने देशातील सर्वात नवी बँक बंधन बँकेच्या ७० टक्के खातेधारकांनी मे-जूनमध्ये हप्ते न भरण्याचा पर्याय निवडला हाेता. दुसरीकडे, आता बँकेचे २४ टक्के ग्राहक हा पर्याय स्वीकारत अाहेत. उर्वरित ग्राहकांनी कर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आयसीआयसीआय बँकेत मोरटोरियम स्वीकारणाऱ्या ग्राहकांची संख्या ३० टक्क्यांवरून घटून १७.५ टक्के, कोटक महिंद्रा बँकेत ३० टक्क्यांवरून घटून ९.७ टक्के झाली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने आर्थिक हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. या कारणास्तव अनेक लोक हप्ता भरण्यात सक्षम झाले आहेत आणि त्यांनी मोरटोरियम फायनान्शियल अँड सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक अतिश मातवाला यांच्यानुसार, जुलैमध्ये अनेक क्षेत्रे नव्याने सुरू झाले आहेत.
मोरटोरियममधून बाहेर येणे चांगले संकेत
बरेच कर्ज मोरटोरियममधून बाहेर येणे ही चांगली बातमी आहे. याची तीन मुख्य कारणे आहेत. प्रथम व्यापार आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे बरेज कर्जदाते आता आपले कर्ज फेडू शकत आहेत. मोरटोरियमचा बराच प्रचार झाला . मोरटोरियमने व्याज वाढेल याची त्यांना जाणीव झाली आहे. - आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाजार डॉट कॉम
फेररचना स्वीकारणाऱ्या कर्जदारांची संख्य घटेल
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,मोरटोरियम स्वीकारणाऱ्या कर्जदारांच्या संख्येत येत असलेली घट या गोष्टीचा संकेत देत आहे की, रिझर्व्ह बँकेकडून प्रस्तावित कर्जाच्या फेररचनेतही कमीच लोक येतील. एका बँकेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बँकांना आशा आहे की, बहुतांश फेररचना एमएसएमई खात्यांत होईल. िकरकोळ कर्जात सर्वात कमी फेररचना होण्याची आशा आहे.
Post a Comment