माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबाहेरील देखील होऊ शकतो, असे मत काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार अहमद पटेल यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या हालचालींनंतर अहमद पटेल यांनी हे मत व्यक्त केले आहे. देशात आलेले कोरोनाच्या स्थिती चांगली झाल्यानंतर पक्षाध्यक्षाची निवडणूक घेतली जाईल, असे अहमद म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाईल आणि गांधी कुटुंबाच्या बाहेरील नेता देखील निवडणूक लढवून अध्यक्ष बनू शकतो, असे वक्तव्य अहमद पटेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. पक्षाने आता गांधी कुटुंबाबाहेरील नेत्याची अध्यक्षपदी निवड करावी असे ऑगस्ट २०१९ मध्येच सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सांगितले होते. ज्या नेत्याची अध्यक्षपदी निवड होईल त्याने एकजुटीने काम करावे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटल्याची आठवणही अहमद पटेल यांनी करून दिली आहे
काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राबाबतही अहमद पटेल यांनी भाष्य केले आहे. पत्र लिहिणे हा पक्षाचा अंतर्गत मालला आहे. संसदीच बोर्ड, संवेदनील प्रकरणांवर लोकांशी विचार-विनिमय करण्याची पक्षात एक व्यवस्था आहे, या व्यवस्थेत सोनिया गांधी या अध्यक्ष म्हणून काम करत राहतील आणि सोनिया गांधी यांना मदत करण्यासाठी एक व्यवस्था तयार केली जाईल. पत्रामधील अनेक गोष्टी विरोधाभासी आहेत. जसे की एका ठिकाणी पक्ष नेतृत्वाला ग्रेट म्हटले आहे, तर दुसरीकडे सामूहिक लीडरशीपची चर्चा करण्यात आली आहे, असे अहमद पटेल म्हणाले.
Post a Comment