परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू!

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती मंगळवारी रात्री उशिरा समोर आली. मात्र, याबाबत संजय दत्त आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान, आज संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने याबाबत आपली प्रतिक्रिया जारी केली आहे.

‘मी सर्व हितचिंतकांप्रती आभार व्यक्त करते, ज्यांनी संजयच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला प्रचंड शक्ती आणि आशीर्वादाची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून आमचं कुटुंब अनेक संकटांमधून गेलं. मला विश्वास आहे की, ही वेळ, हा प्रसंगही निघून जाईल. संजूच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे’, असं मान्यता दत्त म्हणाली.

‘संजू नेहमी लढवय्या राहिला आणि आमचं कुटुंबही. परमेश्वर पुन्हा आमची परीक्षा घेतोय. परमेश्वराला बघायचंय की, आम्ही कसं या संकटाचा सामना करतो. आम्हाला फक्त तुमची प्रार्थना आणि आशीवार्दाची गरज आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही जिंकू, जसं आम्ही नेहमीप्रमाणे जिंकत आलो आहोत, अगदी तसंच जिंकू. चला, या संधीला प्रकाशमान करु आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी वापर करु’, असं मान्यता म्हणाली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post