माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - इंडो तिब्बत पोलिस फोर्स अर्थात आयटीबीपीच्या सात नव्या बटालियनला लवकरच केंद्र सरकारकडून मंजुरी दिली जाणार आहे. नव्या बटालियन्सची तैनाती चीन सीमेवर केली जाणार असल्याची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. पूर्व लडाखमधील गलवान खोर्यात चीनने भारतीय सैनिकांसोबत दगाबाजी केल्यापासून दोन्ही देशांदरम्यान मोठ्या प्रमणात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळापासून भारत आपल्या सैन्य ताकदीत वाढ करीत आहे.
आयटीबीपीच्या सात नव्या बटालियनची स्थापना करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आणला जाणार आहे. बटालियन स्थापनेला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर जवानांच्या नियुक्तीला सुरुवात केली जाईल. नव्या बटालियनच्या स्थापनेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित पडला होता. मात्र, ज्या पद्धतीने चीनने सीमेवर आक्रमक भूमिका घेतली आहे, ती पाहता या बटालियन्सची स्थापना लवकरात लवकर करण्याचा आता भारताचा प्रयत्न आहे.
Post a Comment